पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इडीची पिडा टाळण्यासाठीच उद्धव यांचा औरंगजेबास मुजरा: धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे ग्रामपंचायतीचे, जिल्हा परिषदेचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार नाहीत. मग त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली, असा सवाल करत, इडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मानाचा मुजरा करायला गेलात आणि जय गुजरातही म्हणून आलात, अशा शब्दांत टोला ही लगावला. 

मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांची वाचाळताही वाढत चालली आहे. अहो, हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे, नाहीतर निवडणुकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. 

इडीची पिडा टळण्यासाठीच उद्धव ठाकरे औरंगजेबास मानाचा मुजरा करायला गुजरातला गेले होते आणि तिथे 'जय गुजरात'ही म्हणाल्याचे त्यांनी सांगितले. 

पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकस करणं हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. पवार साहेबांचे नातू व अजितदादांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे, असेही ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok sabha election 2019 ncp dhananjay munde slams on shiv sena chief uddhav thackeray maval parth pawar