पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे: विभागीय आयुक्तांनी जपली माणुसकी, ज्येष्ठ नागरिकांना केली मदत

पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं २४ तास सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले. मात्र दुकानावर जाऊन सामना खरेदी करणे आणि ते ओझं घरापर्यंत घेऊन येणे ज्येष्ठ नागरिकांना कठीण झाले आहे. अशातच पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर बाणेर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. 

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या कर्मचाऱ्यावर इन्फोसिसची कारवाई

पुण्याच्या बाणेर येथील 'अशश्री' ही ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे. याठिकाणी राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या घरातील सामान संपले आहे. घरातील सामान संपल्यावर ते ऑनलाईन सेवेचा वापर करतात. मात्र संचार बंदीमुळे ऑनलाईन सेवेसोबतच अन्य सुविधा बंद झाल्या आहेत. याठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणीबाबत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांना कळताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यापर्यंत ही अडचण पोहचवली.

लॉकडाऊन: पायी घरी जाणाऱ्या ७ जणांना टेम्पोने चिरडले, चौघांचा मृत्यू

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांना अशश्री सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांना संपर्क करुन त्यांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पुरवठा निरीक्षकांनी या सोसायटीमध्ये जाऊन ज्येष्ठांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू तात्काळ उपलब्ध करुन देण्यात आल्या. 

सोनिया गांधींची PM मोदींकडे कळकळीची विनंती!

दीपक म्हैसेकर यांनी तात्काळ घेतलेली दखल आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेमुळे येथील ज्येष्ठांना लॉकडाऊन काळातही आलेला हा सुखद अनुभव त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा होता. अशश्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी दीपक म्हैसेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे.  

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ८७३ वर, तर १९ जणांचा मृत्यू