पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: वाकडमध्ये पोलिसाला मारहाण, तिघांना अटक

पोलिसावर हल्ला

पुण्यातील वाकड परिसरात पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकडमधील काळेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. 

देशात २४ तासांत कोरोनाचे १५४३ नवे रुग्ण, ६२ जणांचा मृत्यू

काळेवाडी परिसरात सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. पोलीस शिपाई शंकर विश्वभर कळकुटे यांना तिघांनी मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी युनूस गुलाब आत्तार (५० वर्ष) 
आणि त्यांची मुलं मतीन युनूस आत्तार (२८ वर्ष), मोईन युनूस आत्तार (२४ वर्ष) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. 

धारावीत दरदिवशी नवं आव्हान - पोलिस उपायुक्त

काळेवाडी परिसरात युनूस रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळला. त्यामुळे पोलिस शिपाई शंकर कळकुटे यांनी त्याला हटकले. यावरुन आरोपीने पोलिसाशी हुज्जत घातली. त्यानंतर आरोपीने पोलिसावर काठीने आणि इतर दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसंच, आरोपीने पोलिसाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. 

देशातील कोरोनाबाधितांपैकी ४१ टक्के रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये