पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन: पुणेकरांकडून मदतीचा हात, मजूरांना जेवण वाटप

शिवाजीनगर भागात मजूरांना जेवण वाटताना पुणेकर

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना बसला आहे. या मजूरांच्या मदतीला पुणेकर धावून आले आहेत. पुण्यातल्या शिवाजीनगर भागामध्ये स्थानिक नागरिकांकडून मजूरांना जेवण वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला धक्का, जीडीपी २.५ टक्के राहण्याची शक्यता

लॉकडाऊनमुळे पुण्यामध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हातात काम नसल्यामुळे दोन वेळचे खाणे आणि राहणे या मजूरांना कठीण झाले आहे. त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. कोणी खायला दिले तर खायचे नाही तर पाणी पिवून हे मजूर झोपतात.

लॉकडाऊनच्या निर्णयाचे सोनिया गांधींकडून स्वागत, काही सूचनाही केल्या

मजूरांवर आलेल्या या कठीण परिस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर भागात राहणारे नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. या नागरिकांनी मोठ्याप्रमाणात जेवण तयार करुन रस्त्याच्या कडेला बसलेल्या सर्व मजूरांना वाटप केले. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सर्व नागरिकांना घरामध्येच थांबण्याचे आवाहन केले आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सुविधा आणि जीवनावश्य वस्तूच्या सुविधा सुरु राहणार आहेत. 

सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानदाराचा 'केरळ पॅटर्न', भन्नाट आयडिया