पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात पालेभाज्यांचा तुटवडा, भाव कडाडले

पुण्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

पुण्यातील बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे.  अनेक भागांत अद्यापही सुरू असलेल्या पावसाचा फटका पालेभाज्यांच्या उत्पादनास बसला आहे. यामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालं आहे. परिणामी बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. 

पिंपरीत ९ बोगस मतदारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

'या हंगामात पुण्यात पालेभाज्यांचा पुरवठा घटला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे भाज्याचं मोठ नुकसान झालं आहे,  अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील आडते असोसिएशनचे  अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली आहे. रविवारी पालक, कोथिंबीर, मेथीच्या दरात २० % पर्यंत वाढ झाली होती.  पालकाच्या १०० जुडींमागे ४०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहे. हा दर गेल्या आठवड्यात  २५० ते ४५० रुपये होते. तर कोथिंबीरीच्या १०० जुडींमागे २ ते ५ हजार रुपये मोजावे लागत आहे. मेथीच्या दरातही वाढ झाली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०० जुडींसाठी १ ते २ हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात मेणबत्तीच्या प्रकाशात मतदान