पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी

संभांजी भिडे

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या काळात शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे व हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हाबंदी करण्यात येणार आहे. १ जानेवारीला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन समारंभाच्या तयारीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षकांनी ही माहिती दिली. 

'जामियातील पोलिस कारवाईत एका डोळ्याची दृष्टी गमावली'

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना २८ डिसेंबर ते १ जानेवारी या दरम्यान  जिल्हाबंदी असणार आहे, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं यावेळी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जिल्हाबंदी  करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी दिली.

दिल्लीत कपड्याच्या गोदामाला आग, ९ जणांचा मृत्यू

१ जानेवारी २०१८ मध्ये  कोरेगाव भीमाच्या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाली होती. यावेळी  विजयस्तंभ अभिवादन करण्यासाठी लाखो लोक  आले होते. मात्र याच दरम्यान भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार उसळला होता.  त्यामुळे आता सुरक्षेचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलिस यंत्रणा तैनात करण्यात येणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:koregoan bhima sambhaji bhide milind ekbote ban in pune during vijaystambha abhivadan din