पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरेगाव-भीमा प्रकरण; सुधीर ढवळेंचा आयोगासमोर साक्ष देण्यास नकार

सुधीर ढवळे

कोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर साक्ष देण्यास माओवादी संबंध प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपी सुधीर ढवळे यांनी नकार दिला आहे. या आयोगाचे सदस्य सुमित मलिक हे कोरेगाव भीमा येथे हिंसक घटना झाली त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव होते. आता ते आयोगाचे सदस्य असल्याने निष्पक्ष व नैसर्गिक न्याय मिळेल असे वाटत नसल्याने साक्ष नोंदवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हर्षवर्धन पाटलांच्या आरोपांमुळे धक्काः सुप्रिया सुळे

ढवळे यांनी आयोगाला एक पत्र दिले असून त्यात कोरेगाव भीमा हिंसाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांसह मलिक कमी पडले असून शासनाच्या भूमिकेची चौकशीची मागणी केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र गडलिंग यांनी सुद्धा न्यायालयातील खटल्यावर परिणाम होईल. यामुळे साक्ष नोंदवली नाही.

कोरेगाव-भीमा हिंसाचारः पुणे पोलिसांचा फादर स्टेन स्वामींच्या घरावर छाप