पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरेगाव भीमा प्रकरण; चौकशी आयोगासमोर येण्यास मिलिंद एकबोटेंचा नकार

मिलिंद एकबोटे

समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांची कोरेगाव-भीमा चौकशी आयोगासमोर शुक्रवारी (दि.१०) साक्ष नोंदवली जाणार होती. परंतु, एकबोटे यांनी त्यांच्या वकिलामार्फत आयोगाला लेखी अर्ज सादर करत साक्षीसाठी गैरहजर राहण्याची मागणी केली आहे. एकबोटे यांची आयोगाचे न्या. जे. एन पटेल आणि सदस्य माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्यासमोर साक्ष होणार होती.

बस-ट्रकच्या अपघातानंतर भीषण आग; २० जणांचा मृत्यू

आयागोने एकबोटे यांचा अर्ज मान्य केल्याची माहिती आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी दिली. राजकीय षडयंत्रातून आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने झाली. त्याबाबत आपण आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे, असे एकबोटे यांनी आयोगाला सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे.

गायी-म्हशीच्या दुधाच्या किंमतीत २ रुपयांनी होणार वाढ