काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा येथील सुरक्षा भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. जून महिन्यात ही दुर्घटना घडली होती. घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिले होते.
पुण्यात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ४ लहान मुले
अल्कॉन स्टायलस सोसायटी संचालक, महापालिका अधिकारी यांच्यासह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विवेक अग्रवाल, विपुल अग्रवाल आणि भिंत बांधणारे अभियंते राजाराम काळे यांच्या विरोधात दोषारोप दाखल केले आहे. इतर जणांविरोधात लवकरच पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
पुणे भिंत दुर्घटना : सोसायटीतील रहिवाशांनी बिल्डरला केले होते सावध
अल्कॉन स्टायलसचे राजेश अग्रवाल, जगदिशप्रसाद अग्रवाल आणि सचिन अग्रवाल, कांचन गु्रपचे पंकज ओरा, रश्मिकांत गांधी, वास्तूविशारद सुनिल हिंगमिरे, महापालिकेचे अभियंते गिरीष लोंढे आणि कैलास कराळे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल आहे.