पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिंचवडमध्ये तरुणीवर चाकूहल्ला, प्रकृती गंभीर

चाकूहल्ला (प्रतिकात्मक छायाचित्र)

चिंचवडमधील (पुणे) डांगे चौक येथे आज (बुधवार) सकाळी एका तरुणीवर  धारदार शस्त्रांनी वार करण्यात आला. गौरी विठ्ठल माळी (२०) असे पीडित तरुणीचे नाव असून या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून विकास शेटे असे त्याचे नाव आहे. डांगे चौक हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुणेः शेतजमिनीवर धुडगूस; कर्नलसह ४० जवानांवर गुन्हा दाखल

अधिक माहित अशी, बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमाराला गौरी या नेहमीप्रमाणे कामाला निघाली होती. डांगे चौकाजवळ ती आली असताना तिच्या मागून येत विकासने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. प्रेम प्रकरणातून विकासने हा हल्ला केल्याचे सांगण्यात येते. गौरी ही डांगे चौकातील एका रुग्णालयात ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते.