पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरीमध्ये लघुशंकेवरुन वाद; अपहरण करुन तरुणाची हत्या

पिंपरीत तरुणाची हत्या

पिंपरी -चिंचवडमध्ये शुल्लक कारणावरुन तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथे लघुशंकेवरुन झालेल्या वादानंतर २४ वर्षीय तरुणाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तरुणाची हत्या केलेल्या आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. 

पाकिस्तानात ४० दहशतवादी गट कार्यरत, इम्रान खान यांची कबुली

मंगळवारी पिंपरी - चिंचवड महापालिकेजवळील मैदानावर जळालेल्या अवस्थेमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला. हितेश मुलचंदानी असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो पिंपरीमध्येच राहणार आहे. आरोपींनी वादानंतर हितेशचे अपरहण करुन त्याची हत्या केली.  हितेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अमिन खान, शाहबाज कुरेशी, अरबाज शेख, अक्षय भोसले आणि आणखी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हितेश मुलचंदानी हा कुणाल बार आणि रेस्टॉरंटचा मालक रोहित सुखेजा याचा मित्र होता. हितेशच्या हत्या प्रकरणी रोहीतनेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिंपरीतील राधिका चौक परिसरामध्ये कुणाल बार आहे. या बारच्या समोरच हितेश आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. 

Mumbai Rains LIVE : प. द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

तक्रारीमध्ये सांगितल्याप्रमाणे, हितेश मुलचंदानी हा बारमध्ये आपल्या मित्रांसोबत आला होता. मध्यरात्री २ वाजता अमिन खान दारु विकत घेण्यासाठी आला होता. दारु विकत घेतल्यानंतर बारच्या समोर जाऊन अमिन लघुशंका करु लागला. त्यावेळी रोहित आणि त्याच्या काही मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमिन खान आणि यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर अमिनसोबत असलेल्या साहिल लालवानी याने कैलास पाटील याच्या डोक्यावर दारुची बॉटल फोडली. त्यानंतर दोन्ही गटातील वाद विकोपाला गेला. अमिन खानच्या मित्रांनी हितेश मुलचंदानीला पांढऱ्या गाडीत जबरदस्ती बसवून घेऊन गेले. त्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह फेकून देण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ

दरम्यान, हितेश मुलचंदानीच्या मित्रांनी पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली आणि आरोपींनी हितेशला गाडीत टाकून गेले. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरु केला असल्याची या घटनेचे तपास अधिकारी रघुनाथ उंडे यांनी दिली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये ५ आरोपींविरोधात कलम ३०२ (हत्या),  ३२६ (अपहरण), कलम ५०४, कलम २०१ आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

PHOTOS : मुंबईला पुन्हा एकदा पावसानं झोडपलं