पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कऱ्हा नदीच्या पूराचे पाणी बारामती शहरासह नदीकाठच्या गावात शिरले

पूराचे पाणी गावात शिरले

पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे कऱ्हा नदीला पूर आला आहे. पुण्यासह पुरंदर तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील नाझरे धरण भरले आहे. त्यामुळे नाझरे धरणातून कऱ्हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत ८५ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांसह बारामती शहराला सुध्दा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. जिल्हा प्रशासनाने आधीत खबरदारी घेत नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात पावासाने घेतला ९ जणांचा बळी; ६ जण वाहून गेल्याची शक्यता

बारामती तालुक्यातील कऱ्हा नदी काठच्या आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, अंजनगाव, कऱ्हावागज, बऱ्हाणपूर, नेपतवळण, मेडद तसेच बारामती शहरालगची खंडोबानगर, पंचशीलनगर, टकार कॉलनी, म्हाडा कॉलनी परिसरामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. पूराच्या पाण्याचा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी घरातील सर्व वस्तू सुरक्षितस्थळी हलवल्या आहेत. दरम्यान, बारामती-मोरगाव, जेजूरी-सासवड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 

पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करू - मुख्यमंत्री

मध्यरात्री तीन वाजल्यापासून प्रशासनाकडून लाऊड स्पिकर लावून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे घाबरून आधीच नदी काठच्या नागरिकांनी घरं सोडली. सध्या त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. २३ वर्षानंतर कऱ्हानदीला पूर आला असल्याची माहिती स्थानिक वयोवृध्द नागरिक देत आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यातील १५ हजार, बारामती शहरातील ६ हजार ५०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. 

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी