पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आम्ही मेगा भरती करणार नाही, जे होईल ते 'मेरिट'वरच : जयंत पाटील

जयंत पाटील

कोणाला पाठिंबा देण्यापेक्षा एकत्रितपणे स्थिर सरकार देण्यावर आमचा भर असेल, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला. दगडापेक्षा वीट मऊ असे म्हणत त्यांनी भाजपपेक्षा शिवसेना बरी आहे, असेही म्हटले आहे.

'मी पुन्हा येईन'; शिवतीर्थावर फडणवीसांविरोधात

ते म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार निकाल लागल्यापासून गोड बातमी मिळेल असे सांगत होते. मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही बातमी मिळालेली नाही. संजय राऊत यांना नक्की कोणती गोड बातमी अपेक्षित आहे, याची मला कल्पना नाही. पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार आणण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. महाराष्ट्रात स्थिर सरकार येण्यासाठी थोडा वेळ लागला तरी चालेल पण मजबूत सरकार येईल, आणि ते पाच वर्षे टिकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अखेर काडीमोड!, शिवसेना एनडीएतून बाहेर, भाजपची घोषणा

भाजपसोबत असलेले काही आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीची मेगा भरती कधी होणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, आम्ही मेगा भरती करणार नाही. आमची भरती ही मेरिटवरच होईल. जे नेते संपर्कात आहेत त्यांची नावे सांगून मला त्यांना अडचणीत आणायचे नाही. परत येण्यास उत्सुक आहेत याबाबतचा निर्णय पक्षातील निष्ठावंत नेते आणि मतदार संघातील लोकांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.