पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DC vs SRH, Eliminator : पृथ्वी 'क्लास शो' दाखवणार?

पृथ्वी शॉ

यंदाच्या आयपीएलमध्ये नाव बदलून मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (दिल्ली डेअरडेव्हिल्स) कमालीची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या छत्रछायेत युवा संघाने आपल्यातील क्षमता सिद्ध करुन प्ले ऑफ पर्यंत मजल मारली. आता या संघासमोर सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.

विशाखापट्टणमच्या मैदानात बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी लढत होणार आहे. या सामन्यात दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉ कशी कामगिरी करतोय हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. पृथ्वी शॉने क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळवले आहे. पण यंदाच्या आयपीएलमध्ये त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी झालेली नाही. साखळी सामन्यात कोलकाता नाईट विरुद्ध त्याने ५५ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ९९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर स्पर्धेत तो फारसा यशस्वी ठरलेला नाही. 

IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या नावे खास विक्रमाची नोंद

आतापर्यंत खेळलेल्या १४ सामन्यातील १४ डावात त्याने २०.८५ च्या सरासरीने २९२ धावा केल्या आहेत. मागील आयपीएलच्या तुलनेतही त्याची कामगिरी खालावली आहे.  हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन आपल्या सरासरीसोबत दिल्ली कॅपिटल्सला स्पर्धेतील पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणारी कामगिरी करण्यात तो यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दिल्लीच्या ताफ्यातील ऋषभ पंत, श्रेयस अय्यर या युवांसह अनुभवी शिखर धवन यांच्यावरही आजच्या सामन्यात मोठी जबाबदारी असेल.