पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाचा वेळही कमी होणार

डेक्कन क्वीन

सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये ज्या पूश-पुल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. तो यशस्वी ठऱला, तर हेच तंत्रज्ञान डेक्कन क्वीनसाठीही वापरले जाईल. त्यामुळे डेक्कन क्वीनचा प्रवासाचा वेळ कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने 'हिंदूस्थान टाइम्स'ला दिली. पुणे-मुंबई या दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज वाढदिवस आहे. ८९ वर्षे पूर्ण करून ही गाडी नव्वदीत पदार्पण करते आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली. शनिवारी सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये सध्या पूश-पूल तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर सात दिवसांसाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. यामुळे घाटामध्ये गाडीला मागच्या बाजूने बँकर (इंजिन) लावण्याची गरज पडत नाही. त्यामुळे गाडीचा वेग वाढतो आणि प्रवासाचा वेळ कमी होतो. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरले, तर ते डेक्कन क्वीनलाही वापरण्यात येईल. त्यामुळे या गाडीतून प्रवास करण्याचा कालावधी कमी होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

हुर्रै! डेक्कन क्वीनची डायनिंग कार बंद करण्याचा निर्णय अखेर मागे 

डेक्कन क्वीनने नव्वदीत पदार्पण केले असताना ही गाडी अद्ययावत करून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. त्यासाठी लवकरच या गाडीला जर्मन पद्धतीने तयार केलेले डबे लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पूश-पूल तंत्रज्ञानही वापरण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

पुणे-मुंबई दरम्यान रोज धावणाऱ्या डेक्कन क्वीनने हजारो प्रवासी रोज प्रवास करीत असतात. या गाडीशी अनेकांचे भावनिक संबंध असल्याचे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.