पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंडिगोच्या विमानात दिसले झुरळ, प्रवाशांना भरपाई देण्याचे ग्राहक न्यायमंचाचे आदेश

इंडिगो

इंडिगोच्या विमानातून प्रवास करीत असताना त्यामध्ये झुरळ दिसल्यावर केलेल्या तक्रारीची व्यवस्थित दखल विमानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. या प्रकरणी पुण्यातील दोन प्रवाशांनी ग्राहक न्याय मंचात केलेल्या अर्जावरून इंडिगो कंपनीला संबंधित प्रवाशांचे तिकीटाची रक्कम ९ टक्के व्याजाने परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भरपाई म्हणून अतिरिक्त ५० हजार रुपये द्यावेत, असेही आदेश ग्राहक न्याय मंचाने इंडिगो व्यवस्थापनाला दिले आहेत. 

नाराजीबाबत माझे मत कायम; फडणवीसांच्या भेटीनंतर खडसेंची प्रतिक्रिया

पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाचे अध्यक्ष उमेश जवळीकर आणि सदस्य क्षितिजा कुलकर्णी व संगीता देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुण्यातील कोथरुडमधील रहिवासी स्कंद असिम वाजपेयी आणि सुरभी राजीव भारद्वाज यांनी ग्राहक न्याय मंचात तक्रार केली होती. ३१ डिसेंबर २०१८ रोजी इंडिगोच्या विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करीत असताना त्यांना हा अनुभव आला होता. त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

दोन प्रवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी ८५७४ रुपयांचे इंडिगोचे दिल्ली ते पुणे विमान प्रवासाचे तिकीट घेतले होते. प्रवास करीत असताना त्यांना त्यांच्या सीटखाली झुरळ असल्याचे दिसले. त्यांनी लगेचच विमानातील कर्मचाऱ्यांना याबद्दल सांगितले. विमानात आवश्यक औषध फवारावे, अशी मागणी त्यांनी केली. पण विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांची मागणी फेटाळली आणि त्यांना एसएमएस किंवा ई-मेलवरून तक्रार नोंदविण्यास सांगितले. 

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक

विमानातून उतरल्यावर इंडिगोच्या कार्यालयात या प्रवाशांनी तक्रार नोंदविली. विमानात झुरळ असल्याचे फोटोही त्यांनी दाखविले. पण तिथेही त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीवरून न्याय मंचाने हे आदेश दिले आहेत.