पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लंकेच्या खेळाडूने शेअर केला पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा व्हिडिओ

श्रीलंकेचा खेळाडू वाहतूक कोंडीत अडकला

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगणार आहे. शुक्रवारी रंगणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्यात दाखल झाले आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला समालोचक म्हणून कार्यरत असलेले रसेल अरनॉल्डही या सामन्यासाठी पुण्यात आले आहेत. त्यांना पुण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

MS धोनी वनडे क्रिकेटला रामराम करेल, शास्त्रींनी वर्तवला अंदाज

त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ शेअर केला. अरनॉल्डने ट्विटरच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करताना 'ओह डिअर! आता कुठे जायचं? असे कॅप्शनही दिल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.   
अरनॉल्डने श्रीलंकेच्या संघाकडून ४४ कसोटी सामन्यात १ हजार८२१ धावा केल्या आहेत. यात १० अर्धशतके आणि ११ बळींचा समावेश आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८० सामन्यात त्याने ३ हजार ९५० धावा आणि ४० विकेट्स घेतल्या आहते.  

IndvsSL: पुण्याच्या मैदानात कोहलीसमोर असेल हे 'विराट' चॅलेंज

भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुवाहाटीतील पहिला सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला एकतर्फी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्याच्या मैदानातील सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे श्रीलंका संघाला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत टाकण्याचे आव्हान असेल.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:india vs sri lanka 3rd t20 match in pune russle arnold gets stuck in pune traffic shared this video watch here