पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे विभागात १ कोटी ८३ लाख व्यक्तींची तपासणी

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १ हजार ३१ झाली असून विभागात १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १२ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन

विभागात १ हजार ३१ बाधित रुग्ण असून ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात ९३६ बाधीत रुग्ण असून ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात २१ बाधीत रुग्ण असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात ३७ बाधीत रुग्ण असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात २७ बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात १० बाधीत रुग्ण आहेत. 

किम जोंग उन यांच्याबद्दलचे ते वृत्त डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळले

आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी ११ हजार ४६ चा अहवाल प्राप्त झाल असून ६६२ नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  ९ हजार ९६४ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ३१ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

बाळाला घरमालकाकडे सोडून डॉक्टर पती-पत्नीकडून कोरोनाबाधितांवर उपचार

आजपर्यंत विभागामधील ४७ लाख ५१ हजार ८०२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत १ कोटी ८२ लाख ७१ हजार ८५७ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९२७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.