पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे जिल्ह्यात १५७ कोरोनाबाधित रुग्ण

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकूण रुग्ण संख्या १९१ झाली असून,  जिल्हानिहाय पुणे-१५७, सातारा-५ सांगली-२६ आणि कोल्हापूर-३ याप्रमाणे रुग्ण आहेत. आतापर्यंत २७ रुग्णांना बरे झाल्यामूळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरीत १५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तपासणीसाठी पाठविलेले एकुण नमुने ३ हजार ६० होते. त्यापैकी २ हजार ९३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून १२७ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी २ हजार ७४२ नमुने निगेटीव्ह आहेत व १९१ नमुने पॉझिटीव्ह आहेत. 

आजपर्यंत १८ लाख ३३ हजार १७७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत ८३ लाख ७९ हजार १४४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ६८७ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

CM ठाकरेंच्या १६० जणांच्या सुरक्षा ताफ्यावर क्वॉरंटाइनची वेळ!

पुणे जिल्हयातील कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्या एकूण १५७ झाली आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये दाखल झालेली रुग्णसंख्या रुग्णालयामध्ये १३६ असून पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील रुग्णालयामध्ये एकूण २१ रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत २७ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. तसेच ५ रुग्णांचा मृत्यु झाला असून उर्वरीत १२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यामधून तपासणीसाठी पाठविलेले एकूण नमुने २ हजार २५५ होते. त्यापैकी २ हजार १५८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ९७ चे अहवाल प्रतिक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी २ हजार १ नमुने निगेटीव्ह आहेत व १५७ नमुने पॉझिटीव्ह आहेत.   

विभागामध्ये शासकीय व स्थानीक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांकडे सदयस्थीतीत एकुण N95 मास्क ६५ हजार ८१५, ट्रीपल लेअर मास्क २ लाख ५४ हजार ६७८ एवढे उपलब्ध आहेत. तसेच ४ हजार २७० पीपीई कीट, ९ हजार ६५ हॅण्ड सॅनिटायझर (५००मिली), ४ हजार ९२ व्हीटीएम कीट व शासकीय रुग्णालयात १४१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत व खासगी रुग्णालयात १ हजार ३२८ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.

'कोरोनाचा एक रुग्ण ३० दिवसांत ४०६ जणांना करु शकतो बाधित'

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात ३३ हजार २११.४५३ मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.  पुणे विभागात अंत्योदय (AAY) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजना अंतर्गत २७ लाख ८ हजार ७११ शिधापत्रिका /कुटुंबापैकी दि. ७ एप्रिलपर्यंत १८ लाख ३१ हजार ४९९ कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदळचे ४ लाख ३४ हजार ७७५.४१  क्विंटल वितरण करण्यात आले आहे.

मार्केटमध्ये विभागात ४६ हजार ९२३  क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक १६ हजार ८४० क्विंटल, फळांची ३ हजार ३२५ क्विंटल  तसेच कांदा/ बटाट्याची ८ हजार २४४ क्विंटल इतकी आवक झाली आहे. विभागात दि.६ एप्रिल रोजी १०३.३५ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २२.३८ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूः जपानमध्ये आणीबाणी जाहीर

विभागामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ११७ व साखर कारखान्यामार्फत ५७५ असे एकुण ६९२ रीलीफ कॅम्प स्थलांतरीत मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकुण ६५ हजार ३७६ स्थलांतरीत मजूर असून एकूण १ लाख १९ हजार ६५६ मजूरांना भोजन देण्यात येत आहे, असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले.

शिवभोजन योजना तालुकास्तरावर, तीन महिने ५ रुपयांत थाळी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:in pune district 157 and in pune division 191 coronavirus affected patient says divisional commissioner dr deepak mhaisekar