पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : मैदानात पाऊल ठेवताच केदारच्या नावे 'या' विक्रमाची नोंद

केदार जाधव

आयपीएलच्या मैदानातील दुखापीतून सावरत केदार जाधवने फिटनेस सिद्ध करुन सलामीच्या सामन्यात संघात स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरताच केदारच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली आहे. 

इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणाऱ्या विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघात निवड झालेला केदार जाधव हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा आणि पुण्याचा पहिला खेळाडू आहे ज्याची विश्वचषक स्पर्धेमध्ये वर्णी लागली आहे. दुखापतीतून सावरुन संघासोबत इंग्लंडला रवाना झाल्यानंतर कोहली त्याला थेट मुख्य सामन्यात संधी देणार का? अशी चर्चा रंगली होती. 

ICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली

कोहली आणि संघ व्यवस्थानाने सलामीच्या सामन्यात केदार जाधववर विश्वास दाखवला आणि वर्ल्ड कपच्या मैदानात उतरणारा पहिला पुणेकर आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा पहिला खेळाडू ठरला. . महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून खेळणाऱ्या ऋषीकेश कानिटकर (१९९७-२००), अभिजीत काळे (२००३) यांनी भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व केले आहे. पण विश्वचषक स्पर्धेच्या संघात स्थान मिळवणारा आणि संघासोबत मैदानात उतरणारा केदार जाधव हा पहिला पुणेकर आहे. या सामन्यात तो कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 kedar jadhav set to be first player from pune to playd world cup match at southampton against South Africa