पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिंचवडमध्ये फडणवीस म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवडमधील 'मोरया यूथ फेस्टिव्हल'च्या उदघाटन कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि भाजप नेते सचिन पटवर्धन यांनी त्यांची मुलाखत घेतल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात मी पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमास 'पुन्हा येईन' असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वाक्यानंतर सभागृहात हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. 

साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, परिसंवादाच्या विषयावर आक्षेप

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचारावेळी 'मी पुन्हा येईन' हा फडणवीसांचा नारा चांगलाच गाजला होता. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपला सर्वाधिक १०३ जागा मिळाल्या पण शिवसेनने साथ सोडल्यामुळे मुख्यमंत्रिपदी पुन्हा पाच वर्षे विराजमान होण्याचा फडणवीसांचा मानस फोल ठरला. अजित पवारांशी हातमिळवणी करत ते पुन्हा मुख्यमंत्री झालेही पण त्यांचा हा डाव फार काळ टिकला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या वादावरुन अखेर त्यांना विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. 

शाळांमध्ये CAAचा प्रचार करणे मुर्खपणा, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

सोशल मीडियावर 'पुन्हा येईन' यावरुन त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. विधानसभा सभागृहातही हा मुद्दा गाजल्याचे पाहायला मिळाले होते. महाआघाडीच्या नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस पुन्हा विधानसभेच्या सभागृहात आले, अशा शब्दांत त्यांना टोमणा मारल्याचेही पाहायला मिळाले होते. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात थट्टेचा विषय ठरलेल्या 'पुन्हा येईन' या आपल्या वक्तव्यावर फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिले होते. 'मी पुन्हा येईन' म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितले नव्हते, असे फडणवीस म्हणाले होते.   

PM मोदी- CM ममता यांच्या भेटीची चर्चा!

पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात फडणवीसांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. माझा स्वभाव शांत आहे. लहानपणी मी खोड्या करायचो नाही पण अशा प्रकारच्या गोष्टीचा साक्षीदार असोयचो. मी बॅटिंग करुन फिल्डिंगच्या वेळी पळ काढायचो, असा बालपणीचा क्रिकेटच्या मैदानातील किस्साही त्यांनी यावेळी शेअर केला.