पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नीच्या जाचाला कंटाळून पुण्यात पतीची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र पुण्यात पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोंढव्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अरुण वाबळे (३४ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोढव्यातल्या एनडीएस रोड परिसरात तो पत्नी दोन मुलं आणि आईसोबत राहत होता. 

उन्नाव प्रकरण :पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी एम्समध्ये तात्पुरते कोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण वाबळे यांचा अर्चनासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत. अरुण वाबळे हा पेटिंगचे काम करायचा तर त्याची पत्नी अर्चना वाबळे ही खासगी शिकवणी घ्यायची. दोघांमध्ये सतत घरगुती कारणावरुन वाद व्हायचे. याबाबत अर्चनाच्या माहेरच्यांना माहिती होते. त्यामुळे तिचे बहिण आणि भाऊ अरुणला सतत त्रास देत होते. त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचे. तसंच त्यांनी अनेकदा अरुणला मारहाण सुध्दा केली होती. 

राजीनामा सत्राच्या पार्श्वभूमीवर सोनियांनी मुंबई अध्यक्षांना बोलावले

पत्नी आणि तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या सततच्या जाचाला कंटाळून अरुणे आत्महत्येचे पाऊल उचलले. त्याने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी अरुण वाबळे यांच्या आईने कोंढवा पोलिस ठाण्यात सून आणि तिच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अरुणची पत्नी अर्चना वाबळे, तिचा भाऊ आणि बहिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अद्याप तिघांना अटक करण्यात आलेली नसून पोलिसांचा तपास सुरु आहे.

वाहतूक नियमः गुजरातने ९० टक्क्यांपर्यंत कमी केली दंडाची रक्कम