पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिंदूस्थान टाइम्सकडून 'एज्युसाइट्स' कॉनक्लेव्हचे आयोजन

हिंदुस्तान टाइम्सच्यावतीने नवा शैक्षणिक उपक्रम

हिंदूस्थान टाइम्सच्यावतीने 'एज्युसाइट्स' कॉनक्लेव्हच्या माध्यमातून नव्या उपक्रमाची सुरुवात होत आहे. विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, सरकारच्या शैक्षणिक धोरणात्मक नितीमध्ये सहभागी अभ्यासक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवारी) कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. यात 'तंत्रज्ञानामुळे बदलत जाणाऱ्या जगात शिक्षणाची भूमिका' या विषयावर लक्षकेंद्रीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पॅनलमधील दिग्गज शहरातील उच्चशिक्षित संवाद साधताना शिक्षणासंदर्भातील आपले विचार आणि अनुभव मांडणार आहेत.   

या कार्यक्रमात वेगाने बदलणाऱ्या युगात होणारे बदल स्वीकारण्यासाठी आपली शिक्षण प्रणाली सक्षम आहे का? आपण भविष्यातील मानवाची आव्हाने समजू शकतो का? आपली शिक्षण प्रणाली पुढच्या पिढीसाठी उज्वल आहे का? अशा प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. 

PMPMLचा नवा उपक्रम, ११ मार्गांवर शटल बससेवा

जागतिक स्तरावरील हार्टफुलनेस संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. कमलेश पटेल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातील मुख्य वक्त्यांमध्ये राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्ण, उच्च आणि तांत्रिक शिक्षण विभागाचे राज्य सचिव सौरभ विजय, सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड) विद्यापीठाच्या प्र कुलपती विद्या यरवदेकर, भारती (डीम्ड) विद्यापीठाचे कुलगुरु एमएम साळुंखे या शिक्षण क्षेत्रातील मोठ्या नांवाचा समावेश आहे.  

याव्यतिरिक्त सन्माननिय पाहुण्यांमध्ये लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि संघ सचिव संजय भाटिया, पुणे आयकर विभागाच्या मुख्य आयुक्त अनुराधा भाटिया आणि राज्य शिक्षण विभागाचे संयुक्त संचालन सुनील मगर उपस्थिर राहणार आहेत.