पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टींकडून मुख्यमंत्री निधीला एक कोटींची मदत

प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन एक कोटीचा मदतीचा धनादेश स्वीका

कोविड-१९ च्या संकटाचा सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ ला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून, मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पुण्यातील प्रसिद्ध 'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत केली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फौंडेशनच्यावतीने ही मदत करण्यात आली.

मुंबईतील 'या' ६ विभागात कोरोनाचे ५३% रुग्ण

याबाबत माहिती देताना  'जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशनचे विश्वजित जाधव यांनी सांगितले, जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही समाजातील विविध उपक्रमांना मदत करत असतो. शेट्टी यांनी अतिशय सामान्य परिस्थितीतून वाटचाल केली आहे. त्यांना समाजातील गरीब आणि दुःखी लोकांबद्दल कळवळा वाटतो. ते समाजातील अडचणीच्या प्रसंगाला नेहमीच धावून जातात. आजवर त्यांनी अनेक उपक्रमांना मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ आणि प्रशासन महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अजित पवारांनी यांनी ज्यांना जे शक्य आहे ती मदत करण्याचे आवाहन केले होते. अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनील मुसळे यांनी याबाबतचा सातत्याने पाठपुरावा केला."

'हॉटेल वैशाली'चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'ला एक कोटी रुपयांची मदत दिली आहे. शेट्टी यांच्या जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशनच्या वतीने ही मदत करण्यात आली. प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन एक कोटीचा मदतीचा धनादेश स्वीकारला. 

अमृतांजन पूल अखेर इतिहासजमा, ब्लास्टिंग करून पूल पाडला

पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, "जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशनने केलेली मदत प्रशासनाचे मनोबल वाढविणारी आहे. समाजातून मदतीचा ओघ वाढला तर आमचे बळ वाढेल. पुणे जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांनी शासनाच्या पाठीशी उभे रहावे. कोरोनाविरोधातील सरकारच्या लढाईला बळ द्यावे."