पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त पद्मनाभन यांची बदली

आर के पद्मनाभन

पिंपरी-चिंचवड या नव्याने तयार करण्यात आलेल्या आयुक्तालयाचे पहिले पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांची शुक्रवारी बदली करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे या संदर्भातील शासन आदेशात म्हटले आहे. पद्मनाभन यांच्या जागी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी संदीप बिष्णोई यांची पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

ऐतिहासिक निर्णय, अर्थमंत्र्यांच्या पाठीवर मोदींकडून शाबासकीची थाप

संदीप बिष्णोई हे वैधमापन शास्त्र विभागात नियंत्रक म्हणून कार्यरत होते. तिथून त्यांची पिंपरी चिंचवडला बदली करण्यात आली आहे. आर के पद्मनाभन यांना तूर्त नवी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यांच्या नव्या नियुक्तीबाबतचे आदेश नव्याने काढले जातील, असे गृह विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

गेल्या वर्षी १५ ऑगस्ट रोजी पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता.