पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'...तर भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करु'

गृहमंत्री अनिल देशमुख

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरुन महाविकास आघाडीमध्ये अजूनही धुसफूस सुरुच आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु झाल्या आहेत. 'भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करु, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच  समांतर तपासाबाबत आम्ही सल्ला घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. पुण्यामध्ये पत्रकारांनी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शपथविधी सोहळ्यासाठी मजूर, शेतकऱ्यांसह ५० जणांना खास निमंत्रण

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, 'भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला असला तरी राज्य सरकारला या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमता येते का? याच्याबाबत आम्ही राज्याच्या महाधिवक्त्यांकडे कायदेशीर सल्ला मागितला आहे. कायदेशीर सल्ला आल्यानंतर एसआयटीची स्थापन करु.' तर, एनआयए'सोबत राज्य सरकारच्या 'एसआयटी'ची स्थापना झाल्यास या प्रकरणाचा समांतर तपास होणार असल्याचे संकेत गृहमंत्र्यांनी दिली आहे.  

लासलगाव प्रकरण: पीडितेची प्रकृती गंभीर, उपचारासाठी मुंबईला

दरम्यान, भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 'हे योग्य नव्हते, अशा पद्धतीचे निर्णय घेताना आपल्या सहकारी पक्षांचा विचार घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे (उद्धव ठाकरे) पॉवर आहे. पण त्याचा वापर विवेकाने करणे आवश्यक होते. आमचे पण मंत्री तिथे आहेत. ते यासाठी लढलेले आहेत,' असे सांगत खरगे यांनी नाराजी व्यक्त केली. 

उद्धव ठाकरेंकडे पॉवर असू शकते, पण.., काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:home minister anil deshmukh says maharashtra government will form an sit to continue the investigation