पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक ठिकाणी घरात शिरले पाणी

पुण्यात अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.

अगदी मतदानाच्या वेळी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री पुन्हा एकदा पुणे परिसराला अक्षरशः धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. कात्रज परिसरात नवीन वसाहत भागात पावसामुळे पाण्याचा मोठा लोंढा वाहू लागला. काही लोकांच्या घरातही पाणी शिरल्याची माहिती मिळाली.

मुलुंडमध्ये नाराज पीएमसी बँक खातेधारांनी निवडला 'नोटा' पर्याय

दुसरीकडे येरवड्यातील शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, बीटी कवडे रस्ता, पद्मावती, मार्केटयार्ड या भागातही पावसाचे पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणीही काही लोकांच्या घरात पाणी शिरले होते. या सर्व ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान नागरिकांच्या मदतीसाठी पोहोचल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. 

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; दोघे जण जखमी

लोहगाव जकात नाक्याजवळ खासगी कंपनीची बस पाण्यात अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या बसमध्ये अंदाजे २० प्रवासी होते. त्यांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूपपणे बाहेर काढले.