पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस

पुण्यात ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

पुणे शहर आणि उपनगरात ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगर,डेक्कन, गणेशखिंड रोड, बाणेर,औंध, कात्रज या परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. परिणामी शहरातील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा कोलमडली. हडपसर-वानवडी परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शहरातील इतर प्रमुख मार्गावरुन पाणी वाहतानाचे चित्र पुन्हा एकदा निर्माण झाले होते. 

'शोले' चित्रपटातील किस्सा सांगत भुजबळांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

संध्याकाळी ६ च्या सुमारास शहरातील पूर्व भागातील उपनगरांमध्ये पावसाने जोर धरल्याचे पाहायला मिळाले. विमाननगर, वडगावशेरी, वाघोली, धानोरी या भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. बिबवेवाडी, कोंढवा परिसरात देखील दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागली. सामना करावा लागला. वारजे- माळवाडी, कर्वेनगर, कोथरुड या भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.