पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दगदगीचा मुंबई-पुणे प्रवास पावसामुळे धाकधुकीचा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे चे संग्रहित छायाचित्र

मुंबई, पुण्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्त्यामार्गे प्रवास करणाऱ्यांना चांगलाच बसत आहे. पावसाळ्यातील मुंबई-पुणे प्रवास डोकेदुखीचा ठरत आहे. पावसामुळे रेल्वे मार्गावर दरडी कोसळत असल्याने अनेक रेल्वे रद्द कराव्या लागत आहेत तर अनेक उशिराने धावत आहेत. रस्ते वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसला आहे. एरवी एक्स्प्रेस वेवरचा ३ ते ४ तासांचा प्रवास आता ५ ते ६ तासांचा झाला आहे. 

शनिवारी सकाळी पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील मंकी हिल परिसरात रुळांवर दरड कोसळल्याने अनेक एक्स्प्रेस रद्द कराव्या लागल्या. दरड कोसळल्याने सीएसएमटी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, पुणे-सीएसएमटी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन रेल्वे रद्द करण्यात आली. या ट्रॅकवरील दरड दूर करण्याचे काम सांयकाळपर्यंत पूर्ण होईल, असी माहिती सीआरपीएडच्या प्रवक्त्याने दिली.

जगबुडी, वाशिष्ठी नदीला पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात घाट परिसरात दरडी कोसळल्यामुळे १० वेळा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या तर अनेक रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले होते. 

रेल्वे रद्द करण्यात आल्यामुळे मुंबई-पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर ताण आला. शनिवारी एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

अभिषेक नायर नावाच्या एका प्रवाशाला वाहतूक कोंडीमुळे सुमारे दोन तास अडकून राहावे लागले. कळंबोली ते पुणे हे अंतर गाठण्यास एरवी २ तास लागतात. पण शनिवारी याच प्रवासासाठी ५ तासांहून अधिक काळ लागला. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली होती. घाट परिसरात वाहने अत्यंत मंदगतीने जात होती, अशी माहिती त्याने दिली.

मुंबईत पुन्हा मुसळधार; जागोजागी पाणी साचले, वाहतूक विस्कळीत