पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणे जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; शेतीसह घरांचे मोठं नुकसान

पावसामुळे घराचे मोठे नुकसान

पुणे जिल्ह्याला मान्सूनोत्तर पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरुर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये वादळी वारा, गारपीठीसह जोरदार पाऊस झाला. तर जुन्नरमधील ओतूर रोहोकडी येथे मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

पाकिस्तानच्या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह आणि गारांसह झालेल्या पावसामुळे शिरुर, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील विजेचे खांब कोसळले आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मोठ-मोठी झाडे जमीनदोस्त झाली आहेत. मान्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाहून गेले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. यामुळे चिंतेत आलेल्या शेतकऱ्याला जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे.  

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याने ताबडतोब शेतीचे पंचनामे करुन मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झाली नाही. घरांचे नुकसान झाल्यामुळे रहायचे कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

वॉर्नर-स्मिथ जोडीसमोर लंकेचा खेळ खल्लास!