पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातील अभियंता तरुणाचा अर्ज

प्रातिनिधिक छायाचित्र

काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसतानाच आता पुण्यातील एका अभियंत्याने या पदासाठी अर्ज करण्याची तयारी केली आहे. आपल्याला हे पद मिळावे, अशी या तरुणाची इच्छा आहे. गजानंद होसाळे असे या २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. 

इलेक्ट्रॉनिक्समधून अभियंता झालेल्या गजानंद होसाळे सध्या पुण्यातील एका कंपनीमध्ये काम करतो. तो लवकरच काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे आपला अर्ज दाखल करणार आहे. गजानंद होसाळे म्हणाला, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे पक्षाचा पुढील अध्यक्ष म्हणून कोणाला नेमावे, यावरून सध्या मोठा गोंधळ आहे. त्यामुळेच मी या पदासाठी अर्ज करण्याचे ठरविले आहे.

मुंबईतील सोसायट्यांमध्ये लवकरच सार्वजनिक पार्किंगची शक्यता

काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तरुणांकडे त्याचे नेतृत्त्व देण्याची गरज आहे. राहुल गांधी यांनीही तरुणांकडे नेतृत्त्व देण्याची भूमिका मांडली होती. या सर्व स्थितीत मला पक्षाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे वाटते, असे त्याने म्हटले आहे. 

काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदी कोणीच नसल्याने अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. काहींनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे. या स्थितीत पक्षाच्या परफॉर्मन्सवरही परिणाम झाला आहे, याकडे गजानंद होसाळे यांनी लक्ष वेधले.

पुण्यात आयटी कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून अध्यक्षपदी कोण येणार यावर केवळ चर्चा सुरू आहे. पण अद्याप पक्षाने अध्यक्षपदी कोण येणार हे निश्चित केलेले नाही.