पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सभ्यपणाचा राष्ट्रवादीने गैरफायदा घेतला, हर्षवर्धन पाटलांचा आरोप

हर्षवर्धन पाटील (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. इंदापूर येथे बुधवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी येत्या १० तारखेला आपला निर्णय सांगणार असल्याचे जाहीर केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेतही दिले. आमच्यावर सभ्यतेचे संस्कार आहेत. पण राष्ट्रवादीने त्याचा गैरफायदा घेतला. एक नाही तर पाच लोकसभा निवडणुकीत त्यांचे (पवार) काम केले. पण आम्हाला काय मिळाले, असे म्हणत, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा निघाली तेव्हा इंदापूरमध्ये येणार नव्हती. पण मग अचानक कशी आली, असा सवालही त्यांनी केला.

तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणाला नवे वळण

पाटील पुढे म्हणाले की, गेली पाच वर्षे सत्तेत नव्हतो. पण मंत्रालयात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कामे केली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उभे राहण्याची ऑफर दिली होती. पण आपण ती नाकारली. पण तरीही त्यांनी मनात राग धरला नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. हे सर्व नेते शब्दाला जागणारे होते, असे त्यांनी म्हटले.