पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी एन गाडगीळ अँड सन्सच्या बँक खात्यातून हॅकर्सकडून ३ कोटींची चोरी

सायबर गुन्हेगारी

महाराष्ट्रातील प्रख्यात सराफी व्यावसायिक पी एन गाडगीळ एँड सन्सच्या बॅंक खात्यातून हॅकर्सनी तब्बल तीन कोटी रुपये लंपास केले. तीन दिवसांच्या अवधीत ४० संशयास्पद ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून हॅकर्सनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पी एन गाडगीळ एँड सन्सचे प्रशासकीय अधिकारी आदित्य मोडक यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी गृह मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्त

आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते १३ नोव्हेंबरमध्ये पी एन गाडगीळ एँड सन्सच्या बँक खात्यातून ही चोरी करण्यात आली. हॅकर्सनी बँकेतील खाते हॅक केले. त्यानंतर बँकेची सुरक्षाव्यवस्था छेदण्यात आली आणि बनावट ओळखीच्या माध्यमातून ही रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली. आता ज्या खात्यांमध्ये ही रक्कम वळविण्यात आली. त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.

हॅकर्सनी ऑनलाईन माध्यमातून पैसे चोरण्यासाठी पी एन गाडगीळ एँड सन्सच्या बँक खात्यांचे पासवर्ड बदलले. त्याचबरोबर इतर आवश्यक माहितीही बदलली. त्यानंतर या बँक खात्यातून पैसे काढून ते इतरत्र वळविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. 

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

१३ नोव्हेंबर रोजी बँक खात्यामध्ये ऑनलाईन लॉग इन करता येत नसल्याचे समजल्यावर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर तातडीने बँकेमध्ये कळवून खात्यावरील व्यवहार स्थगित करण्याची मागणी करण्यात आली. पण तोपर्यंत हॅकरनी तीन कोटी रुपये काढले होते.