पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवजयंतीसाठी हडसर किल्ल्यावर गेलेल्या तरुणीचा पडून मृत्यू

हडसर किल्ला

जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावरून पडून एका तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी ही तरुणी हडसर किल्ल्यावर गेली होती. सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ही घटना घडली. सिध्दी कामठे (२० वर्ष) असं या तरुणीचे नाव असून ती मुंबईची आहे. 

औरंगाबादमध्ये भाजपला धक्का; किशनचंद तनवाणी स्वगृही परतले

शिवजयंती साजरी करण्यासाठी मुंबईतील तरुणांचा एक गट जुन्नरजवळील हडसर किल्ल्यावर गेला होता. सकाळी साडेअकरा ते बारा दरम्यान हा गट हडसर किल्ल्यावर चढत होता. त्याचवेळी या गटातील सिध्दी कामठेचा पाय घसला आणि ती किल्ल्याच्या बुरुजावरुन खाली पडली. सिध्दी जवळपास साडेचारशे फूट खोल दरीत पडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. 

अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर 

या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सिध्दीला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. तिला ताबडतोब नजीकच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. पोलिसांनी सिध्दीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सिध्दीच्या कुटुंबियांना माहिती दिली. 

'वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी तयार, ईश्वरीय कार्याबाबत शंका