पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील 'या' परिसरात पार्किंगचे दर वाढणार

या परिसरात पार्किंग करण्यासाठी मोजावी लागणार अधिक पैसे

पुण्यातील कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात वाहन पार्किंग करणाऱ्यांऩा आता पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाने परिसरातील वाहन पार्किंगचे दर वाढी संदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये हा ठराव मांडण्यात आला होता.    

पुण्यातील भाजपच्या पारंपारिक मतदार संघात सेनेचा उमेदवार मैदानात

निविदा काढून कंत्राट नव्या कांत्राटदाराकडे दिल्यापासून हे नवे दर लागू होतील, अशी माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. चार चाकी वाहनांसाठी सध्याच्या घडीला चार तासांसाठी १० रुपये आकारण्यात येतात. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सुधारित प्रस्तावानुसार वाहन चालकाला २० रुपये मोजावे लागतील. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत दिवसभराच्या पार्किंगसाठी २० रुपये ऐवजी ४० रुपये मोजावे लागणार आहेत. तर चारचाकी वाहन धारकांना मासिक पाससाठी ३०० ऐवजी ६०० रुपये एवढी रक्कम मोजावी लागेल. 

'तुरुंगात गेलेल्यांनी शरद पवारांनी काय केलं हे सांगू नये'

दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या पार्किंग दरातही वाढ प्रस्तावात अपेक्षित आहे. त्यानुसार, चार तासांसाठी दुचाकी स्वाराला सध्या ४ रुपये मोजावे लागतात. नव्या दरानुसात त्यांना ५ रुपये द्यावे लागतील. दिवसभरासाठीच्या पार्किंगसाठीचा दर ८ रुपयांवरुन १० रुपये करण्यात येणार आहे.