पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील खड्ड्यांमुळे जर्मनीचे लोकही त्रस्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पुण्यातील खड्डे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्ड्यांमुळे केवळ शहरातील नागरिकच त्रस्त झाले आहेत असे नाही, तर परदेशातून कामानिमित्त येथे आलेले लोकही खड्ड्यांना आणि वाहतूक कोंडीला कंटाळले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि चाकण येथील प्रमुख रस्त्यांवरील आणि चौकातील खड्ड्यांवर तातडीने उपाय शोधा. त्याचबरोबर वाहतूक कोंडीवर मार्ग काढा, ही मागणी करण्यासाठी जर्मनीच्या एका शिष्टमंडळाने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पुण्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची भेट घेतली. 

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील, लोढांकडे मुंबईची जबाबदारी

मुंबईतील जर्मन उच्चायुक्त कार्यालयातील उच्चाधिकारी जर्गन मॉर्हार्ड यांच्या नेतृत्त्वाखाली १५ जर्मन कंपन्यांमधील प्रतिनिधी या शिष्टमंडळात सहभागी होते. यावेळी त्यांनी विविध मागण्या प्रशासनापुढे ठेवल्या. त्यापैकी खड्डे आणि वाहतूक कोंडी या दोन प्रमुख मागण्या होत्या.

पिंपरी-चिंचवड आणि चाकणमधील प्रमुख चौकांमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकचा मंदावलेला वेग आणि वाहतूक कोंडी या सर्वावर मार्ग काढण्याची मागणी शिष्टमंडळाने प्रशासनाकडे केली.

... या कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या व्याजदरात कपात

इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या विभागीय संचालक मीरा दळवी-साहनी म्हणाल्या, पुण्यामध्ये सुमारे ३२० जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. त्यापैकी ३५ कंपन्या चाकणमध्ये आहेत. यापैकी ५ ते ६ कंपन्यांनी मुंबईतील उच्चायुक्त कार्यालयाकडे या भागातील खड्ड्यांबद्दल तक्रार केली होती. 

आता हा विषय जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचविण्यात आला आहे.