पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

गौतम नवलखा

एल्गार परिषद प्रकरणात पत्रकार आणि  मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांची अटकपूर्व जामीन याचिका पुणे सत्र न्यायालयाने फेटाळून लावली. गेल्या आठवड्यात न्यायालयाने आपला निर्णय १२ नोव्हेंबरपर्यंत सुरक्षित ठेवला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नवंदर यांनी याप्रकरणी मंगळवारी निकाल दिला. नवलखा यांच्या वकील रोहिणी आहुजा आणि सरकारी वकील विलास पठारे सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित होते.  

मोठा निकाल : सरन्यायाधीशांचे कार्यालयही माहिती अधिकाराच्या कक्षेत

अंतरिम संरक्षण मिळाल्याने तपास अधिकाऱ्यांना तपासामध्ये अडचणी येत आहेत, अशी बाजू सरकारी वकिलांकडून मांडण्यात आली होती. एल्गार परिषद प्रकरणातील गुन्हा रद्द करण्यासाठी नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौकशी सुरु असताना गुन्हा रद्द करता येणार नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळवण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यासाठी चार आठवड्याचे अंतरिम संरक्षण दिले. मंगळवारी ही मुदत संपली.