पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यात परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपी फरार

पतीच्या समोरच या नराधमांनी पीडितेवर सामुहिक बलात्कार

पुण्यामध्ये एका २८ वर्षीय परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

CAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी अडवले

पीडित तरुणीचा साड्यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री या तरुणीने घरी जाण्यासाठी एका व्यक्तीला लिफ्ट मागितली. कारमधून जात असताना या व्यक्तीने त्याच्या मित्राला बोलावून घेतले. धानोरी येथे पीडित तरुणीला नेऊन तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. या घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मोदी की शहा, कोण खरं बोलत आहे?, ओवेसींचा सवाल

दरम्यान, पीडीत तरुणीने मंगळवारी पहाटे विमानतळ पोलिस ठाण्यात जाऊन दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस धानोरी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करत आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बंगालमध्ये विद्यार्थ्यांनी राज्यपालांना अडवले, काळे झेंडेही दाखवले