पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून एकदा पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हाच

गुरुजी तालीम मंडळ

पुण्यात विसर्जन मिरवणुकीस सुरूवात झाली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथला गणेशोत्सव हा निराळाच असतो. इथला मिरवणूक सोहळा हा सर्वार्थानं खास आणि पाहण्यासारखा असतो चला तर जाणू घेऊयात पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीतील काही खास गोष्टी. 

हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती

- पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक ही नेहमीच दिमाखदार असते. या शहराचे सांस्कृतिक वैभव दर्शवणारा मिरवणूक सोहळा असतो. 
- पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीची महापैरांच्या हस्ते आरती होते आणि विसर्जन मिरवणुकीस सुरूवात होते. 
- पारंपारिक वेशभूषेतील महिला, युवतीचे पथक, सनई चौघडे मिरवणुक सोहळ्यात पाहायला मिळतात.
- पुण्यातील अनेक नावाजलेली ढोल ताशा, लेझीम पथकं या मानाच्या पाचही गणपतीच्या मिरवणूक सोहळ्यात सहभागी होतात. 
- ढोल ताशांचा गजरात, पालखी किंवा रथातून मानाच्या पाचही गणपतींची मिरवणूक निघते.

PHOTO : 'लालबागच्या राजा'ची भव्य मिरवणूक

- मिरवणूक मार्गात भव्य, रंगीबेरंगी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या जातात. 
- कसबा आणि तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दोन गणपतीची  मिरवणूक ही  पालखीतून निघते.
- तर तुळशीबाग, केसरीवाडा  गणपतीची मिरवणूक रथातून निघते.
- रथांना केलेली आकर्षक फुलांची सजावट ही पाहण्यासारखी असते.