पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज

पुणे गणेश विसर्जन

लाडक्या बाप्पाची १० दिवस मनोभावाने पूजा आणि सेवा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहे. गणपती विसर्जनासाठी पुणे महानगर पालिका आणि पुणे पोलिस देखील सज्ज झाले आहे. गणपती विसर्जन ठिकाण आणि मिरवणुकीच्या मार्गावर जवाळपा ७ हजार पुणे पोलिस तैनात झाले आहेत. त्याचसोबत गणपती विसर्जन ठिकाणी पुणे महापालिकेने सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. 

बाप्पाच्या विसर्जनसाठी मुंबईत ५० हजार पोलिस तैनात

पुण्यातली गणपती विसर्जन मिरवणूक अतिशय पारंपारिक पध्दतीने काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यासह राज्यभरातील गणेशभक्त येत असतात. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यामध्ये चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणपती विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पुण्यातील लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन महाविद्यालय रोड हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सोयी-सुविधांनी सज्ज

पुण्यामध्ये गणपती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी आणि पालिकेने केले आहे. गर्दीच्या ठिकाणी संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास याची माहिती ताबडतोब पोलिसांना द्यावी. तसंच दागिने घालून फिरु नये, पालकांनी लहान मुलांवर लक्ष द्यावे, गर्भवती महिलांनी, वृध्दांनी गर्दीत जाणे टाळावे, चोरांपासून सावध रहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

साताऱ्यात ट्रक-बसचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू २० जखमी

तसंच, गणपती विसर्जना दरम्यान पार्किंगसाठी देखील जागा राखीव ठेवण्यात आली आहे. नदीपात्राशेजारील रस्ते, गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस, काँग्रेस भवन ते महापालिका रस्त्यापर्यंत, हमालवाडा पार्किंग आणि नारायण पेठ याठिकाणी पार्किंग करता येऊ शकते असे सांगण्यात आले आहे. गणपती मिरवणुकीत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांना देखील पालिकेने आवाहन केले आहे. या पथकातील वादकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. स्वत:जवळ लिंबू आणि पाण्याच्या बॉटल ठेवाव्यात, ढोल वाजवताना दुसऱ्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. 

४८ नगरसेवकांसह गणेश नाईकांनी हाती घेतला भाजपचा झेंडा