पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती

कसबा गणपती

पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे इथल्या गणेश विसर्जनाचा थाट हा वेगळाच असतो.

श्री कसबा गणपती
पुण्यातील पाच मानाच्या गणपतीपैंकी पहिला गणपती म्हणजे श्री कसबा गणपती होय. पुण्याचे ग्रामदैवत म्हणून छत्रपती  शिवाजी महाराजांच्या काळापासूनच कसबा गणपती प्रसिद्ध आहे. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ पासून सुरूवात झाली. कसबा गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघते. पालखीत विराजमान झालेली गणरायाची मूर्ती कार्यकर्त्यांच्या खांद्यावरून मार्गक्रमण करते. या मिरवणुकीत रुद्रगर्जना, रमणबाग प्रशाला यांसारखी ढोल ताशा पथकं सहभागी होतात. 

Ganesh Visarjan 2019 LIVE: पुण्यामध्ये मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

तांबडी जोगेश्वरी
कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरी हा पुण्यातील दुसरा मानाचा गणपती होय. कसबा गणपतीप्रमाणेच १८९३ पासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. बुधवार पेठेतल्या तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सवास भाऊ बेंद्रे यांनी सुरूवात केली. चांदीच्या पालखीतून गणरायाची मिरवणूक निघते.  अश्वारूढ युवती, नगारावादन या मिरवणुकीत पाहायला मिळतं. या मिरवणुकीतून समाज प्रबोधनपर फलकं हाती घेतलेल्या कार्यकर्त्यांचे पथक असते. 

गुरुजी तालीम मंडळ
गुरुजी तालीम मंडळचा गणपती हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती होय. गुरुजी तालीम मंडळाच्या गणेशोत्सवास १८८७ मध्ये सुरुवात झाली. नागब्रह्म, नगारावादन आणि अश्वराज बँडपथक  ही तीन ढोल ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी असतील.  फुलांच्या रथात गुरुजी तालीम मंडळाची बाप्पाची मुर्ती विराजमान असेन. 

गणपती विसर्जनासाठी पालिका प्रशासन सोयी-सुविधांनी सज्ज

तुळशीबाग 
पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणजेच तुळशीबागेतला गणपती होय. १९०० मध्ये या गणेशोत्सवास प्रारंभ झाला. इथल्या देखाव्यांसाठी हा गणपती प्रसिद्ध आहे. आकर्षक मयूर रथात तुळशीबाग  मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघते. ढोल ताशा पथकाबरोबरच, लेझीम पथक हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य असतं. 

 केसरीवाडा 
केसरीवाडा  गणपती हा पुण्यातील पाचवा मानाचा गणपती होय. १८९४ पासून गणेशोत्सावास सुरूवात झाली. विविधरंगी फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामध्ये गणेशाची मूर्ती विराजमान होऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी होईन. ढोला ताशा पथकाबरोबरच सनई आणि नगारा वादन  मिरवणुकीचं वैशिष्ट्ये असेन.