पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आले गणराय! उत्साहाच्या आणि मांगल्याच्या उत्सवाला सुरुवात!

गणेशोत्सव २०१९

वर्षभर ज्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहिली जाते... तो आल्यावर त्याच्या सेवेत घरातील आणि मंडळातील सगळेजण आपापल्यापरीने झोकून देतात... काही दिवस रोजच्या दिनक्रमात बदल करून त्याच्यासाठी खास वेळ काढला जातो... त्याच्या आरतीसाठी घरातील सगळेजण आवर्जून एकत्र येतात... अशा लाडक्या गणरायाचे सोमवारी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळात आगमन झाले. विधिवत पूजा करून बाप्पा घराघरांत विराजमान झाले आहेत. आता पुढील ११ दिवस हे फक्त बाप्पांचे असतील.

अब्दुल्ल सत्तारांच्या हाती भगवा, सिल्लोडमधून उमेदवारीही जाहीर

महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा हे एक समीकरणच झाले आहे. दरवर्षी बाप्पांच्या आगमनासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू होते. जसजसा श्रावण महिना संपून भाद्रपद महिना सुरू होण्याचे वेध लागतात... तसतसे भक्तांच्या उत्साहात वाढ होते. प्रत्येक घरात आपापल्यापरीने मोठ्या भक्तिभावाने बाप्पांची सेवा केली जाते. त्याच्यासाठी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. ठरलेल्या ठिकाणाहून बाप्पांची मूर्ती घरी आणली जाते आणि मग त्याची विधिवत पूजा केली जाते. या सगळ्या कामात घरातील लहानग्यांसोबतच वृद्धही सहभागी होतात. 

जी स्थिती घरामध्ये तीच थोड्याफार फरकाने मंडळात दिसते. तिथेही गणपती बाप्पांच्या आगमनासाठी कार्यकर्ते काही महिने आधीपासून कार्यरत असतात. देखावा कोणता करायचा, मिरवणुकीसाठी रथ कसा हवा, इतर मंडळांपेक्षा आपल्याकडे काय वेगळेपण आहे यावर दिवसरात्र चर्चा आणि काम सुरू असते. आज दिवसभर वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पांचे आगमन होते आहे.

Live: अमित शहांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची परंपरेप्रमाणे पालखीतून मिरवणूक काढत प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूकही नेहमीप्रमाणे पालखीतून काढण्यात आली. मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाची मूर्ती फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान झाली होती. यंदा प्रथमच या मंडळाच्या मिरवणुकीत कारागृहातील कैद्यांचे ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते. 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक काढून वाजत गाजत प्रतिष्ठापना कऱण्यात आली. मानाचा पाचवा केसरीवाडा सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती केसरीवाड्यातील मंडपात विराजमान झाली आहे.

मुंबईतील गणेश गल्लीतील प्रसिद्ध मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा या दोन्ही मंडळांच्या मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. हजारो भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी जमलेले आहेत.