पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिनेमाचे ऑनलाइन तिकीट रद्द करताना फसवणूक

ऑनलाइन फसवणूक

'बुक माय शो' या अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पद्धतीने सिनेमाचे बुकिंग केलेले तिकीट रद्द करताना अज्ञाताने एकाच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डेटिंग साईटवर ओळख झालेल्या महिलेला भेटण्यासाठी CA ने घालवले तीन लाख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील एका व्यक्तीने अमनोरा मॉलमधील एका मल्टिप्लेक्समधील एका चित्रपटाचे बुकिंग केले होते. तक्रारदाराने नंतर चित्रपट पाहण्याचे रद्द केले आणि बुक माय शोच्या वेबसाइटवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर मोबाइल धारकाने तक्रारदाराला बँक खात्याच्या क्रमांकाबाबत विचारणा केली. 

अतुल परचुरेंची ऑनलाईन फसवणूक, गुन्हा दाखल

तक्रारदाराने अज्ञाताला बँक खात्याचे शेवटचे सहा क्रमांक दिले. त्यानंतर अज्ञाताने तक्रारदाराच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले.