पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुण्यातील कोरोनाविरोधातील लढ्यासाठी चार IAS अधिकारी मैदानात, अजित पवारांचा निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील कोरोना विषाणू प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवा निर्णय घेतला आहे. त्यांनी अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंह आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.

कोरोना विषाणूची 'ही' आहेत ६ नवीन लक्षणं

राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. सचिंद्र प्रतापसिंह यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त पदाची तर, कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे. हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत लॉकडाऊन दरम्यान पोलिसांवर हल्ला, चौघांना अटक

पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. विशेषतः भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:four senior IAS officers had given Pune citys additional responsibility to control situation in the city