पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलाला टोळक्याकडून मारहाण; कपडे फाडले, अंगावर लघुशंकाही केली

मुलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

काही तरुणांनी एका अल्पवयीन मुलांवर शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना पुण्यात समोर आली आहे. आरोपी तरुणांनी पीडित मुलाचे कपडे काढले, त्याला मारहाण केली आणि त्याच्या अंगावर लघुशंकाही केली. पीडित मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

ऑनलाइन मास्क मागवणाऱ्या मुंबईतील महिलेला ४ लाखांचा गंडा

पुण्यातील हडपसरमध्ये गेल्या गुरुवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या दिवशी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असल्याचे पीडित मुलाने घरी सांगितले आणि तो बाहेर पडला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली.

सहा आरोपींपैकी चौघांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. विनीत सूर्यकांत बिरादर (वय १९), शुभम राजाभाऊ जाधव (वय १९), देविदास घनश्याम पव्हाने (वय २१) आणि भरत विशाल राठोड (वय २१) अशी चार आरोपींची नावे आहेत. रविवारी या चौघांना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सर्व आरोपी तरूण एकमेकांचे मित्र आहेत. शिवजयंतीच्या दिवशी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यादिवशी पीडित मुलाचे सध्या फरार असलेल्या दोन आरोपींपैकी एकाशी भांडण झाले. त्यामुळे आरोपींनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले आणि पीडित मुलाशी भांडण सुरू केले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्याला मारहाण केली. त्याचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर लघुशंकाही केली. 

कोरोनातून बरा झालेला म्हणतोय, हॉस्पिटलमध्ये खूप वेबसीरिज बघितल्या

बेल्हेकर वस्तीवर लाल कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत पीडित मुलगा सापडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे, असे पोलिसांनी सांगितले.