पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी रुग्णालयात, आयसीयूत उपचार सुरु

अरुण शौरी

माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांना प्रकृती अस्वास्थामुळे पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. शौरी यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत, असे रुबी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एक नवा पैसाही परत पाठवला नाही, फडणवीसांनी हेगडेंचा दावा फेटाळला

रविवारी सायंकाळी लवासा सिटीमधील घराच्या अंगणात फेरफटका मारताना भोवळ येऊन ते पडले. त्यामुळे त्यांच्या मेंदूला आणि डोक्याला इजा झाली आहे. त्यानंतर त्यांना हिंजवडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या रुबी रुग्णालयात हलवण्यात आले.

'पंकजा मुंडे काय अनेक प्रमुख नेते शिवसेनेच्या संपर्कात'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Former Union Minister and senior journalist Arun Shourie is admitted at Ruby Hall Clinic in Pune