पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वाहतुकीचे नियम पाळा, १०० रुपयांचे व्हाऊचर मिळवा!

पुणे पोलिस

वाहतुकीचे नियम पाळले नाही, म्हणून दंड आकारणारे पोलिस आपण सगळीकडे बघतोच. पण एखादा वाहनचालक वाहतुकीचे सर्व नियम पाळतोय, म्हणून त्याचे कौतुक करण्याचा प्रकार विरळाच. आता असाच एक उपक्रम पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात येणार आहे. वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या निवडक वाहनचालकांना १०० रुपयांचे व्हाऊचर गिफ्ट देण्यात येणार आहे. काही निवडक रेस्तराँमध्ये आणि मॉल्समध्ये हे व्हाऊचर देऊन वाहनचालक खरेदी करू शकतील. पुण्यातील वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ही माहिती दिली.

काय सांगता!, पुण्यात वाहन नोंदणीत चक्क घट

पुण्यातील वाहतूक विभागाचे प्रमुख आणि शहरातील उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, पुण्यातील वाहनचालकांसाठी एका नव्या योजनेवर सध्या काम सुरू आहे. जर एखाद्या वाहनचालकाला वाहतूक विभागाच्या पोलिसांनी थांबवले आणि त्याच्या नावावर किंवा तो जी गाडी चालवत आहे त्यावर कोणतेही ई चलन प्रलंबित नसेल. त्याच्याकडे गाडीची सर्व आवश्यक कागदपत्रे असतील, तर पोलिसांकडून त्याला १०० रुपयांचे व्हाऊचर देण्यात येईल. सध्या एक ऑनलाईन सिस्टिम तयार करण्यावर आम्ही काम करतो आहोत. जर पोलिसांनी एखाद्या वाहनचालकाला थांबवले आणि त्याच्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे असली, तर आम्ही त्याला एक १२ अंकी क्रमांक त्याच्या मोबाईल क्रमांकावर पाठवू. हा क्रमांक म्हणजेच व्हाऊचर असून, संबंधित वाहनचालक निवडक रेस्तराँ आणि शॉपिंग मॉल्समध्ये तो क्रमांक वापरून खरेदी करू शकतो.

पुण्यात रेल्वे पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे, सगळंच रेकॉर्ड होणार

योजनेचे सर्व नियम आखण्यावर सध्या आम्ही काम करतो आहोत. काही व्यावसायिक आम्हाला एकूण बिलावर १० टक्के सवलत द्यायला तयार आहेत. त्या स्थितीत संबंधित वाहनचालकाला १०० रुपयांपेक्षा जास्तही फायदा होऊ शकतो. तर काही व्यावसायिक १०० रुपयांचीच सूट द्यायला तयार आहेत. आम्ही हे सर्व घटक लक्षात घेऊन योजना तयार करीत आहोत, असे पंकज देशमुख यांनी सांगितले.

लोकांना वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लागावी, यासाठी आम्ही ही योजना आखत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.