पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंदापूरला पूराचा फटका; अनेक गावांचा संपर्क तुटला

ब्रेकिंग न्यूज

पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्याला पाऊस नसताना देखील पूराचा फटका बसला आहे. भीमा आणि नीरा नदीला पूर आल्यामुळे पूराचे पाणी नदीकाठच्या गावांमध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर इंदापूर तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान असलेले नीरा नरसिंहपूर या गावाला पूराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे या गावाचा पुणे आणि सोलापूर जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. नीरा नरसिंहपूर गावातील ग्रामस्थांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले आहे. 

पूरग्रस्तांना तातडीची मदत करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी पाहणी केली. हर्षवर्धन पाटील यांनी बोटीमध्ये बसून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. नीरा नरसिंहपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. उजनीमधून भीमा नदीमध्ये 1 लाख 60 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये 90 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. दोन्ही नद्यांना पूर आला आहे. पूराचे पाणी आसपासच्या गावांमध्ये शिरल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर; बचावकार्यासाठी नौदल दाखल