पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नाशकात पूर आलाय अन् महाजन नाचण्यात मग्नः अजित पवार

अजित पवार आणि गिरीश महाजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये एवढा मोठा पूर आला आहे आणि आपले मंत्री लोकांच्या मदतीला जाण्याऐवजी नाचत होते. राज्यात काय चाललंय. नाचायचं काम तुमचं नाही, असा टोला लगावला. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभप्रसंगी शिवनेरी येथे बोलत होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे सोमवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. यात गिरीश महाजन यांनीही नृत्य केले होते. तोच धागा पकडत अजित पवार यांनी महाजन यांच्यावर टीका केली. दरम्यान, गिरीश महाजन यांनी पवार यांच्यावर पलटवार केला. अजित पवारांची मनस्थिती ठीक नाही. त्यामुळे नैराश्येतून त्यांनी हे वक्तव्य केले असेल, अशा शब्दांत त्यांनी पवारांना उत्तर दिले.

गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावलीः जितेंद्र आव्हाड 

राष्ट्रवादीची आजपासून खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी येथून शिवस्वराज्य यात्रा सुरु झाली आहे. त्याच्या शुभारंभाच्या सभेत अजित पवार बोलत होते. 

ते म्हणाले की, एवढं पाणी आलंय पण काही मंत्री सोमवारी रात्री नाचत होते. नाचायचे कार्यक्रम नाचणारे करतील. तुमचे काम लोकांना मदत करण्याचे आहे. काय चाललंय राज्यात. 

'नेतृत्त्वावर विश्वास नसल्यानेच नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश'

यावेळी पवार यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. पण कार्यकर्त्यांमधून महाजन यांचे नाव आले. त्यावर त्यांनी लोकांनाही माहीत आहे, असेही म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:flood is going on in nashik and minister girish mahajan performing dance ncp leader ajit pawar slams