पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुणेः ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात जवानांसह ५ जण अडकले

खड्ड्यात पडलेल्या मुलाला वाचवायला गेलेले अग्निशामक दलाचे जवानही अडकले

ड्रेनेजसाठी खोदलेल्या सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात पडलेल्या दोन मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या दोन अग्निशामक जवानांच्या अंगावर मातीचा ढिगारा पडला. या मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन जण गाडले गेले. ही घटना पुण्यातील दापोडी येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. चार जणांना बाहेर काढण्यात यश आले असून आणखी एका व्यक्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. 

दापोडी येथील विनियार्ड चर्चच्या मागील बाजूस ड्रेनेज लाइनसाठी एक खड्डा खोदण्यात आला आहे. सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात एक मुलगा पडला असल्याची माहिती अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. खड्ड्यात पडलेल्या मुलाला बाहेर काढत असताना अचानक मातीचा ढिगारा खाली कोसळला. यामध्ये खड्ड्यात पडलेल्या मुलासह अग्निशामक दलाचे दोन जवान आणि आणखी एक नागरिक यात गाडले गेले. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. बचावकार्य सुरू असून आतापर्यंत चौघांना बाहेर काढण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Five people including two fire brigade personnel trapped in a hole that was dug for a drainage line in Dapodi area of Pune